|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वाहतूक कोंडीबाबत चर्चा

वाहतूक कोंडीबाबत चर्चा 

केडीएमसीत पालिका, वाहतूक पोलीस, आरटीओची संयुक्तिक बैठक

कल्याण / प्रतिनिधी

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी, पोलीस, ट्राफिक, आरटीओ या विभागांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली.

कल्याण-डोंबिवली शहरात नागरिकांना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी भेडसावत असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आज स्थायी समिती सभापती राहुल दामले, वाहतूक पोलीस, आरटीओ, पालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कल्याण शिळ रोड वरील काटई जंक्शन, लोढा जंक्शन, डोंबिवली फाटा, व्यंकटेश पेट्रोल पंप, सुभाष चौक, इंदिरा चौक यासह महत्वाच्या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी शहरात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहतुकीला शिस्त लावताना अडचणी येत आहेत. रस्त्यात मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आलेल्या क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याची बाब वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या निदर्शनास आणून देत हे क्रॉसिंग बंद करण्याची मागणी केली. हे क्रॉसिंग बंद करण्याचे आश्वासन देत सिग्नल यंत्रणेसह आवश्यक कामे स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यातून मार्गी लावण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पालिकेने खाजगी विकासकाकडून चौकाचे सुशोभिकरण करून घेतले आहे. तसेच या पद्धतीने अनेक चौकांचे सुशोभिकरण केले जात आहे. मात्र, सुशोभिकरण करताना चौकाची रुंदी कमीत कमी ठेवली जावी. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची सूचना पोलिसांनी केली. दरम्यान, दुर्गाडी ते पत्रीपूल दरम्यान उभारण्यात आलेल्या गोविंदवाडी बायपासवर कोणत्याही नियमांचे पालन न करता 50 पेक्षा जास्त स्पीड ब्रेकर बसविण्यात आले असून उंचीची मर्यादा देखील पाळण्यात आलेली नाही. यामुळे वाहनचालक या रस्त्याचा वापर टाळत असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणले. त्यामुळे हे स्पीडब्रेकर काढून टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Related posts: