|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कालिया मर्दन रहस्य

कालिया मर्दन रहस्य 

भगवंताने केलेल्या कालिया मर्दन लीलेचे पारमार्थिक रहस्य उलगडून दाखविताना भागवताचार्य वै. डोंगरे महाराज म्हणतात-कालियाचा फणा तर मर्यादित होता, आमच्या हजारो आहेत. आमचे संकल्प विकल्प म्हणजे फणाच. भगवंताला प्रार्थना करा की, माझ्या कालिया नागाचे दमन करा. त्यावर आपले चरणकमल ठेवा.

कालिया नागाच्या तर तोंडातच विष होते. आमच्या एकेका इंद्रियात आणि मनातही विष भरलेले आहे. एक व्यक्ति आम्हाला डोक्मयातला काटा वाटतो, तर दुसरा रत्न. अशा प्रकारचे राग द्वेष, विषय विकार इत्यादी विषच आहेत. जोपर्यंत इन्दीये वासनारूपी विषाने भरलेली आहेत तोपर्यंत भक्ती होऊ शकणार नाही. इंद्रीखयांना नाही, पण इन्दीयांमध्ये समाहित विष नष्ट करायचे आहे. या विषाला सत्संगाने कमी करीत रहा. कालिया नाग इन्दीयाध्यास आहे. यमुनारूपी भक्तींत इन्दीयाध्यास आला तर शुद्ध भक्ती होणार नाही. भोग आणि भक्ती पारस्परिक शत्रू आहेत. भक्तीच्या मिषाने इन्दीयांना भुलवणारा कालिया नाग आहे. केवळ इन्दीयांनीच नव्हे, तर मनानेही विषयांचा त्याग कराल तर भक्ती सिद्ध होईल. भक्तीत विलासभोगरूपी विषधर शिरल्याने भक्ती नष्ट होते. भक्तिमार्गाचे आचार्य वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभु इत्यादी सर्व परिपूर्ण विरागी होते. सहज सापडलेला अमूल्य परीस नामदेवरायांनी चंद्रभागेच्या पाण्यात भिरकावून दिला. शिवरायाने पाठविलेली पालखी व नजराणा तुकाराम महाराजांनी परत पाठविला. ही उदाहरणे काय सांगतात? पूर्ण वैराग्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. भक्ती, ज्ञान वैराग्याची जननी आहे. भक्तिमार्गाचे ते आचार्य सर्वस्व त्याग करून सगळय़ा जगात भ्रमण करीत असत. परंतु पुढे जाऊन या मार्गात पुष्कळसे विलासी कालिया नाग शिरले आणि त्यांनी भक्तिमार्गाला विषमय करून टाकले, अपमानित केले.

सेवा करणे सोपे नाही. संसारसुखाचा मनानेही त्याग करणाराच देवसेवा आणि देशसेवा करू शकतो. महाप्रभूंनी म्हटले आहे-ईश्वरावर आणि ईश्वर सेवेवर अनुराग, प्रेम आणि शारीरिक सुखविलासांप्रति वैराग्य ठेवाल तरच भक्तिमार्गात पुढे जाऊ शकाल. देवसेवा आणि देशसेवा यात इन्दीयांच्या लालन पालनाला काहींच स्थान नाही. इन्दीयांचा सेवक देवसेवा कधीच करू शकणार नाही.

सगळीच इन्दीये वासनेच्या विषाने भरलेली आहेत. भगवंतांनी अनेक दैत्यांचा नाश केला होता. परंतु कालिया नागाचे मात्र नुसते दमन केले होते. त्याला नियंत्रित केले होते. इन्दीयांचा नाश नाही, नियंत्रण करायचे आहे. त्यांना विवेकाने वश करायचे आहे. इन्दीयांना सत्संग झाला पाहिजे. तेथे त्यांना भक्तिरसाची प्राप्ती होईल आणि ती शुद्ध होतील. इन्दीयातील विष पिळून टाका आणि सत्संग मंडळीत त्यांना पाठवून द्या. कालिया नागाला भगवंतांनी विषरहित करून समुद्रातील रमणक द्वीपावर पाठवून दिले होते. इन्दीयांना शुद्ध कराल तर ती भक्तिरसांत लीन होऊ शकतील. जोपर्यंत इन्दीयांमध्ये वासनारूपी विष भरलेले असेल तोपर्यंत भक्तीची प्राप्ती होणार नाही. विषरहित करून इन्दीयांना रमणक द्वीपांतील सत्संगात पाठवून द्या. भक्तीद्वारे इन्दीयांना रमणक द्वीप सत्संगात रमण होऊ द्या.

Related posts: