|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » अण्णाभाऊ महामंडळ घोडाळय़ाच्या फाईल्स लंपास

अण्णाभाऊ महामंडळ घोडाळय़ाच्या फाईल्स लंपास 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

 अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटींच्या घोटाळय़ाप्रकरणीच्या फाईल्स झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून काही फाईल्स पणविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

  पळविण्यात आलेल्या फाईल्स या साठे महामंडळ घोटाळय़ाच्या आहेत की इतर ह अजूनहे कळू शकले नाही. सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत असून त्याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे. घोटाळय़ाशी संबंधित सर्व फाईल्स आणि रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले होते. तरी, फाईल्स लंपास करणाऱयांमध्ये घोटाळय़ातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळय़ाप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरूंगात आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळय़ाबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.