|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रजनीकांतच्या निवासात बॉम्ब लावल्याची धमकी

रजनीकांतच्या निवासात बॉम्ब लावल्याची धमकी 

चेन्नई

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतसह तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी देण्यात आल्याने रविवारी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. एकाच क्रमांकावरून दोनदा फोनकॉल करून धमकी देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांसह रजनीकांतची सुरक्षा कडेकोट करण्यात आली. तसेच त्यांच्या निवासस्थानांवरही बंदोबस्त वाढविण्यात आला. श्वानपथकांच्या सहाय्याने दोन्ही ठिकाणी तपासणीही करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. फोनकॉल करून धमकी देणाऱयाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.