|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दिड वर्षापासून पशुवैद्यकीय डॉक्टर नाही

दिड वर्षापासून पशुवैद्यकीय डॉक्टर नाही 

प्रतिनिधी/ म्हसवड

सातारा जिह्यातील एकमेव व माण तालुक्यातील पहिले मंञी होण्याचा मान मिळविलेल्या  राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्ध विकास मंञी महादेव जानकर साहेब हे ज्या पशुसंवर्धन विभागाचे मंञी गेले दोन वर्षे झाले असताना त्याचे मुळगाव असलेल्या माण तालुक्यातील पळसावडे गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचे उपकेंद्र असुन या ठिकाणी  गेले दिड वर्षा पासुन पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असुन पळसावडे व देवापुर गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा भेट घेवून वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी केली असताना ही त्याकडे कानाडोळा करून गावकयांना हि डावलणयाचा प्रयत्न जानकर साहेब करत असल्याने नागरीकात नाराजी दिसुन येते आहे 

      दुष्काळी माण तालुक्यात जनावरे पालन व्यावसाय हा मुख्य व्यवसाय असुन माण तालुक्यात शेळी पालन मेंढी पालन  गायी बैल म्हैसी पालन करून दुध व्यावसाय शेतीला जोडधंदा म्हणुन माण तालुक्यात पाहिला जातो तालुक्यात धनगर समाज मोठय़ा प्रमाणात असल्याने मेंढी व्यवसाय हा प्रामुख्याने केला जातो पळसावडे देवापुर या गावासाठी आठ वर्षांपूर्वी नव्याने पशुवैद्यकीय उपकेंद्र  मंजुर झाले होते या उपकेंद्रात चार वर्षे एक पशुवैद्यकीय अधिकारी याने काम पाहिले तर त्याच्या जागेवर आलेले पशुवैद्यकीय अधिकारी आडीच वर्षे काम केले त्या अधिकायांची बदली झाल्यानंतर गेले दिड वर्षा पासुन पळसावडे येथील पशुवैद्यकीय उपकेंद्र डॉक्टर विना पडुन असुन येथील सेवकच वैद्यकीय अधिकारी नसल्याने आलेल्या शेतकयांच्या जनावराची तपासनी करून इंजेक्शन गोळ्या औषध देवून  उपचार करून शेतकयांची अडचन होऊ नये लाख मौलाची जनावरे मुला प्रमाणे सांभाळलेल्या शेतकयांचा तोटा होऊ नये म्हणून उपचार सेवक करतात त्यावेळी तो शेतकरी त्या सेवकाचे आभार मानाय विसरत नाही माञ मंञी जानकर यांच्या विषयी नाराजी माञ शेतकरी  बोलून दाखवत असतो 

 माण तालुक्यात पळसावडे येथे ज्या प्रमाणे हे पद रिक्त आहे तसे गेले वर्षभर म्हसवड येथील प्रथम श्रेणीचे पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले सव्वा वर्षा पासुन कायम स्वरूपी  पशुवैद्यकीय अधिकारी नाही वरकुटे येथील रहिवासी असलेले डॉ इनामदार यांच्याकडे म्हसवड व वडजल हे दोन प्रथम श्रेणीचे दवाखान्याचा चार्ज देण्यात आला आहे म्हसवडचे काम सर्व केंद्रात जास्त असल्याने वाडय़ावस्त्यावर जावून उपचार करावा लागतो त्यामुळे म्हसवडला कायम स्वरूपी जागा भरण्याची मागणी अनेक वेळा केली माञ त्याकडे ही दुर्लक्ष जानकर साहेबानी केले आहे 

माण तालुक्यात म्हसवड दहिवडी वावरहिरे मोहि व वडजल ही पाच प्रथमश्रेणीचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तर उपकेंद्र वरकुटे मलवडी पळसावडे देवापुर मार्डी पळशी बिजवडी मलवडी कुळकजाई व महिमानगड ही आठ उपकेंद्र असुन या आठ केंद्रा पैकी फक्त पळसावडे पद रिक्त तर प्रथम श्रेणीच्या पाच पैकी फक्त म्हसवड हे पद रिक्त आहे  ज्या गावानी जानकरसाहेबावर भरभरून मताच्या रूपाने प्रेम दिले त्याच गावावर जानकरसाहेबाचा राग का अशी चर्चा सुरू आहे  

Related posts: