|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » जेट एअरवेजचा रौप्यमहोत्सवी टप्पा

जेट एअरवेजचा रौप्यमहोत्सवी टप्पा 

प्रतिनिधी/ पुणे

भारतातील आंतरराष्ट्रीय विमान कंपनी जेट एअरवेज या कंपनीने आपले 25 वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा मैलाचा टप्पा पार केला आहे.

1993 च्या सुरूवातीच्या काळात केवळ 4 एअरक्राफ्टच्या ताफ्याने 6 ठिकाणी सेवा देण्यापासून आज 119 एअरक्राफ्टच्या ताफ्याने व पार्टनर एअरलाईन्सच्या मदतीने जगभरातील अंदाजे 450 ठिकाणी सेवा देणाऱया जेट एअरवेजने भारतासह आंतरराष्ट्रीय प्रवाशांना व प्रेट व्यवसायाला उत्तम सेवा दिली आहे. तसेच भारतात व जगात व्यापार व पर्यटनवाढीला मोठी चालना देत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

25 व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना जेट एअरवेज अध्यक्ष नरेश गोयल म्हणाले, हा टप्पा आमच्यासाठी आनंदाचा आहे. आमच्यादृष्टीने हा मैलाचा दगड असून, यापुढेही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असू.