|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » बोरिवलीजवळ रेल्वे टॅक ओलांडतांना चार भावांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू

बोरिवलीजवळ रेल्वे टॅक ओलांडतांना चार भावांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू 

ऑनलाईन टीम / बोरिवली :

बोरीवली ते कांदीवली स्टेशनदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या अपघातात मृत्यू झालेले चौघेही कणकवलीहून मुंबईतील घरी परतत होते. त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना टेनची धडक लागून चौघांचा मृत्यू झाला. सागर संपत चव्हाण, साईप्रसाद मनोहर चव्हाण, मनोज दीपक चव्हाण, दत्तप्रसाद मनोहर चव्हाण अशी मृतांची नावे आहेत. या चौघांपैकी सागर हा कांदिवलीला राहणारा होता तर इतर तिघे कणकवलीचे रहिवासी होते. सोमवारी सकाळी सागरच्या घरी जाण्यासाठी सगळे निघाले होते. त्यावेळी बोरिवलीला टेनने जाताना पोईसर- कांदिवली येथे सिग्नला लोकल थांबली. यावेळी तिघांची टेनमधून उडय़ा मारल्या. ट्रक ओलांडत असताना चर्चगेटहून येणाऱया गाडीची धडक या चौघांना बसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.