|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात शंभूराजांची जयंती उत्साहात

शहरात शंभूराजांची जयंती उत्साहात 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील विविध संघटनांच्यावतीने छत्रपती शंभूराजांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शहरात तसेच ग्रमीण भागात छत्रपती संभाजी राजेंची जयंती साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी शाही मिरणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शहरातील धर्मवीर युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोरील बागेत असणाऱया शंभू राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संगम माहुली येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर अभिवादन केले.

तसेच भारतमाता मंडळाने छत्रपती शंभू राजेंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. यामध्ये संभालीराजेंच्या जयंतीचे आयोजन एका मंडळातर्फे न करता सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी मिळून केले व मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.

Related posts: