|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » शशांक मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी फेरनिवड

शशांक मनोहर यांची आयसीसी अध्यक्षपदी फेरनिवड 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शशांक मनोहर यांची आयसीसीच्या स्वतंत्र अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. या पदासाठी ते एकमेव उमेदवार असल्याचे आयसीसी बोर्डाने सांगून त्यांची फेरनिवड झाल्याचे सांगितले.

शशांक मनोहर हे 2016 मध्ये पहिले स्वतंत्र आयसीसी अध्यक्ष बनले होते. त्यांची आता पुन्हा दोन वर्षासाठी निवड झाली असून या पदासाठी ते एकमेव उमेदवार होते. गेल्या महिन्यात कोलकात्या झालेल्या आयसीसीच्या बैठकीतच त्यांची निवड निश्चित करण्यात आली होती. त्यांनी मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक बदल केले असून 2014 चा प्रस्ताव त्यांनी उलट केला तर संशोधित आराखडाही लागू केला, ज्यात आयसीसीच्या स्वतंत्र महिला संचालक नियुक्तीचाही समावेश आहे. ‘आयसीसी चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती होणे हा माझा सन्मान असून सहयोगी संचालकांचा मी आभारी आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही सर्वानी मिळून पुढे पावले टाकली असून 2016 मध्ये नियुक्ती झाल्यावर जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली आहेत. पुढील दोन वर्षात क्रिकेटसाठी वैश्विक रणनीती तयार करण्याची आयसीसीचे योजना आहे,’ असे मनोहर यांनी सांगितले.  सदस्यांच्या सहकार्याने ही रणनीती लागू करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामुळे या खेळाची व्याप्ती जास्तीत जास्त देशात वाढेल आणि जगभरातील जास्तीत जास्त शौकीन त्याचा आनंद घेतील. सध्या हा खेळ चांगल्या स्थितीत असून आम्ही त्याचे रक्षक असल्याने ही स्थिती कायम राखण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: