|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोन विद्यार्थ्यांची रेल्वेखाली आत्महत्या

दोन विद्यार्थ्यांची रेल्वेखाली आत्महत्या 

प्रतिनिधी/ मडगाव

भर वेगात येत असलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन एक विद्यार्थी व विद्यार्थिनीने  आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र सोमवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. दक्षिण भारतातील कोचिवेल्लू – लोकमान्य टिळक टर्मीनस या मार्गावर धावणाऱया 22114 क्रमांकाच्या रेल्वेखाली या दोन्ही विद्यार्थ्यानी आत्महत्या केली.

सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमाराला ही रेल्वे सारझोरा येथे पोहोचली तेव्हा हे दोघेजण या रेल्वेसमोर आली. दोघेही मिठी मारलेल्या स्थितीत होती. सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत या रेल्वेने या मुलांना ओढून नेले आणि नेताना त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करुन गेली.

सुमारे 100 मीटर अंतरावर गेल्यानंतर रेल्वे चालकाने रेल्वे थांबविली आणि जवळच्या रेल्वे स्थानकाला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर ही खबर रेल्वे पोलिसांकडे गेली आणि त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. पाहतो तो तुकडे झालेले दोन मृतदेह पडलेले होते. जवळच एक तीन महिन्याचे अर्भक या युवतीच्या पोटातून बाहेर आले होते. या घटनेने तेथे गेलेल्या पोलिसांचेही मन सुन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अल्पवयीन मुलीला दिवस गेले होते आणि लोकलज्जास्तव तिने व त्याने या जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला असावा आणि त्यासाठी रेल्वे जाणाऱया लोहमार्गाचा स्वीकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

या घटनेसंबंधी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्याशी संपर्क साधला तेव्हा या कोवळय़ा मुलांच्या या दुर्देवी घटनेने तेही हेलावून गेले होते. ‘रेल्वे चालकाने पोलिसांना जी माहिती दिली ती त्यांनी यावेळी ‘तरुण भारत’च्या कानी घातली.

‘ही दोन्ही मुले अकस्मात रेल्वेसमोर आले. धावत्या रेल्वेसमोर अकस्मात आल्यामुळे काहीही करता आले नाही. तरीही थोडय़ा अंतरावर जाऊन रेल्वे थांबविली आणि जवळच्या रेल्वे स्थानकाला माहिती दिली’ असे कोचिवेल्लू – लोकमान्य टिळक टर्मीनस या मार्गावर धावणाऱया 22114 क्रमांकाच्या रेल्वे चालकाने माहिती दिली असे श्री. गावस यांनी सांगितले.

दोन्ही विद्यार्थीच

या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी ही बारावी पास झालेली तर मुलगा अनेकदा दहावी परिक्षा नापास झाल्यामुळे आता बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावी अभ्यासक्रम करीत होता अशी पोलिसांनी माहिती दिली. या घटनेने आजुबाजुच्या गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Related posts: