|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » कर्नाटक निवडणूक : कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

कर्नाटक निवडणूक : कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल काल जाहिर झाला असून यानंतर मोठय़ा राजकीय घडामोडी घडत असल्याचे चित्र दिसत आहेत. कारण भाजपा आणि काँग्रेस – जेडीएस या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. कर्नाटकात राजकीय हालचालीला वेग आला असून सध्या कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही. कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचे बळ आहे.

Related posts: