|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग

भारतात गुंतवणूकीसाठी चीनकडून विशेष फंडची निर्मिती बिजिंग 

बिजिंग

 इाखडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि आयसीबीसी या चीनच्या आघाडीच्या सरकारी बँकेने केवळ भारतात गुंतवणूक करण्यासाठी एका विशेष फंडाची निर्मिती केली आहे. या फंडाच्या माध्यमातून चिनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीची संधी प्राप्त होणार आहे.  भारताच्या विकासाचा वेग चीनपेंक्षा अधिक असून अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. इंडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना क्रेडीट सूस इंडिया मार्केट फंड असे या फंडाचे नाव आहे. भारताच्या विकासाचा वेग जादा असल्याच्या कारणामुळे यांचा फायदा चिनी गुंतवणूदारांना मिळवून देण्यासाठी या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. एका फंड मॅनेजरने दिलेल्या माहितीनूसार या फंडाच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यात येणार असून,तो अर्थव्यवास्थेतील चढउतारवर लक्ष ठेऊन असेल.

Related posts: