|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘मंडळ आपलं आभारी आहे’ चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात

‘मंडळ आपलं आभारी आहे’ चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

विलास वाघमोडे आणि उन्मेष वाघमोडे यांच्या वृंदा वन फिल्म्स प्रस्तुत ‘मंडळ आपलं आभारी आहे’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मंगळवारी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते टिंबर मार्केट येथील शिंदे लॉन येथे झाले. यावेळी कुलकर्णी यांनी चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा दिल्या.

यावेळी चित्रपट निर्माते विलास वाघमोडे, उन्मेष वाघमोडे, लेखक विद्यासागर अध्यापक, सहाय्यक दिग्दर्शक परशुराम गवळी, कॅमेरामन महेश डिग्रजकर, कार्यकारी निर्माता मिलिंद अष्टेकर, सहाय्यक लेखक डॉ. निलेश माने, सिने अभिनेता संजय मोहिते, कैलास वाघमारे, योगेश सोहनी, अनुप वेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.