|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » मनसेला आणखी एक धक्का : शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ?

मनसेला आणखी एक धक्का : शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एका धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीकेशी येथील एका लग्नासमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्यश बराचकाळ चर्चा झाली होती. त्यामुळे शिंदे लवकरज शिवसेनेत प्रवेश करतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱया मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता.