|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पोरस, महाकालीच्या वृंदावन स्टुडिओला आग

पोरस, महाकालीच्या वृंदावन स्टुडिओला आग 

ऑनलाईन टीम / पालघर :

पोरस,महाकाली, शनिदेव या मालिकाच्या सेटला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये वृंदावन स्टुडिओ जळून खाक झाला आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी इथे ही आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेल्sढ नाही. परंतु स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचे मोठे काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. वृंदावन स्टुडिओत पोरस, महाकाली, शनिदेव आणि छोटय़ा-मोठय़ा धार्मिक मालिकांचे चित्रीकरण होते.