|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल-डिझेल आणखी चार रूपयांनी महागणार ?

पेट्रोल-डिझेल आणखी चार रूपयांनी महागणार ? 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्मयता आहे. जर सरकारी कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.

 

कर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एकूण मार्जिनमध्ये मोठं अंतर निर्माण झालं होतं. हाच तोटा भरुन काढण्यासाठी ही वाढ केली जाऊ शकते.

कर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांनी 19 दिवासांनंतर सोमवारी पुन्हा दररोज दर बदलण्याच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल 69 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे, त्यामध्ये शुक्रवारी झालेली 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे.