|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊस बिल, पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन

ऊस बिल, पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन 

रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

शेतकऱयांची ऊस बिले अद्याप रमेश जारकीहोळी यांच्या साखर कारखान्याने दिली नाहीत. पीक विमाही दिला नाही. शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून तातडीने या सर्व समस्या सोडवाव्यात, यासाठी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

शेतकऱयांनी साखर कारखान्यांना ऊस पाठवून दोन ते तीन वर्षे उलटली आहेत. तरीदेखील सौभाग्य लक्ष्मी साखर कारखान्याने शेतकऱयांची ऊस बिले दिली नाहीत. यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. याचबरोबर पीक विमाही अजून देण्यात आला नाही. सध्या काही भागातील शेतकऱयांना विम्याची रक्कम दिली गेली आहे. पण ती तुटपुंजी आहे. 12 ते 14 हजार रुपये देण्याऐवजी केवळ 3 ते 4 हजार देऊन शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम विमा कंपनीने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱयांचे संपूर्ण कर्ज माफ करणे गरजेचे होते. पण काही ठरावीक रक्कम माफ करण्यात आली आहे. एकप्रकारे हा शेतकऱयांवर अन्याय आहे.

शेतकऱयांवर सरकारने आजपर्यंत अन्यायच केला आहे. यामुळेच शेतकरी कायम कर्जबाजारी बनला आहे. तेव्हा तातडीने या समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना निवेदन दिले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, अशोक यमकनमर्डी, मल्लाप्पा अंगडी, जयश्री गुरवण्णावर, जगदीश देवरेड्डी यांच्यासह रामदुर्ग परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related posts: