|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » जनता मतपेटीतून उत्तर देईल ; शिवसेना

जनता मतपेटीतून उत्तर देईल ; शिवसेना 

ऑनलाईन टीम /  पालघर :

पालघर, भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.मुख्यमंत्री साम, दाम, दंड.भेद नीतीचा वापर करून ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करत असल्याचा आरोप करत गोरखपूर, फुलपूर पोटनिवडणुकीत जे घडले तेच पालघर येथे आणि गोंदियात घडेल, असा आशावादही व्यक्त केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱया योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल फडणवीस बोलायला तयार नाहीत. आता जनताच त्यांना मतपेटीतून बोलून दाखवतील, असा इशाराही दिला.

देशात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा झटका बसला. आता महाराष्ट्रातही वेगळा निकाल लागणार नाही. शिवरायांचे राज्यदेखील परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकेल. फडणवीसांचा पोलीस-महसूल यंत्रणेचा वापर करत निवडणूक लढवण्याचा उद्योग राज्याच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याची भीती सेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून व्यक्त केली.