|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » राज्यात मान्सून वेळेवर येणार, केरळात मान्सून दाखल

राज्यात मान्सून वेळेवर येणार, केरळात मान्सून दाखल 

ऑनलाईन टीम / पुणे :

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱया सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दिली आहे. नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सून भारताच्या वेशीपाशी आला असून कोणत्याही क्षणी / पुढील 24 तासांत तो मायभूमी केरळात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल होणार आहे.

बंगालचा उपसागर व लगतच्या भागात तसेच कर्नाटक व केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्रनिर्माण झाले आहे. याच्या प्रभावामुळे कर्नाटक, केरळ तसेच महाराष्ट्रातील कोकण व गोव्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढीलदोन दिवस किनारपट्टीवर वेगाने वाहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. मध्य प्रदेश व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती तसेच मराठवाडा व विदर्भावर असलेल्या ट्रफमुळे विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.