|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांचे निधन

कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्dयाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते.

हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. के जे सोमय्या रुग्णालयात पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अस्वस्थ होत असल्याने पांडुरंग फुंडकर पहाटे चार वाजता उठले. त्यानंतर त्यांना उलटी झाल्याने, त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवलं. त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांना हार्टअटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.