|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अभियंता बनण्याचे स्वप्न अधुरे

अभियंता बनण्याचे स्वप्न अधुरे 

बेळगाव / प्रतिनिधी :

बेंगळूर येथील आर. व्ही. कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया बेळगावच्या वेंकटच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतीच परीक्षा संपवून तो बेळगावला स्वगृही आला होता. पालक आणि मित्रांसमवेत थोडा वेळ व्यतित करण्याची त्याची इच्छा होती. परंतु त्या इच्छेबरोबरच अभियंता बनण्याचे त्याचे स्वप्नही अधुरे राहिले.

पुट्टा वेंकट श्रीनंदन (वय 18) हा चौगुलेवाडी येथील हेमाश्री अपार्टमेंटमधील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील पी. श्रीहरी राव हे एलआयसीमध्ये अधिकारी आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने सध्या बेंगळूर येथे राहत असलेला वेंकट हा काही दिवसांपूर्वी सुटीसाठी आला होता. त्याच्या अकाली निधनाचा त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवाराला तीव्र धक्का बसला आहे.