|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी फर्नांडिस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी फर्नांडिस 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी शहर अध्यक्षपदी ऑगस्तीन पास्कू फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी ही निवड जाहीर केली आहे. सावंतवाडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट केली जाणार आहे. जे राष्ट्रवादी सोडून गेले त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यात येईल, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

फर्नांडिस हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गत नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाला उभारी देण्याच्या दृष्टीने निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी शहराची जबाबदारी दिली आहे.

फर्नांडिस म्हणाले, सावंतवाडी शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो. आज शहराचा जो विकास दिसतो तो कुणा व्यक्तीमुळे नसून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा जोमाने राष्ट्रवादी पक्ष बळकट केला जाईल. राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.

Related posts: