|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गोळीबार घटनेतून युवती बचावली

गोळीबार घटनेतून युवती बचावली 

प्रतिनिधी/ सातारा

जुन्या भांडणाच्या कारणावरुन गुरूवारी सायंकाळी बुधवार नाक्यावर झालेल्या गोळीबारात जखमी झालेली युवती अश्विनी कांबळे †िहची प्रकृती सुधारत असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अश्विनीच्या नातलगांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर फायरिंग करणारा आरोपी ऋषभ जाधव (रा. रविवार पेठ) हा आपल्या दोन सहकाऱयांसह फरारी झाला आहे. पोलीस पथके त्यांच्या मागावर रवाना झाली आहेत.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ऋषभ जाधव हा आपल्या दोन सहकाऱयांसह दुचाकीवरुन ट्रिपल सिट बसून बुधवार पेठेत आला. बुधवार पेठेतील अतिक शेख या युवकाबरोबर ऋषभ जाधवचा पुर्वीचा वाद होता. या वादातून अतिकला कायमचेच संपवायचे असे ठरवून ऋषभ जाधव तिथे पोहचला. परंतु अतिक हा मुलांच्या कोंडाळ्य़ात उभा असल्यामुळे ते तिघे त्याच्याकडे रागात पाहत निघून गेले होते. त्यानंतर काही वेळाने हे तिघे पुन्हा बुधवार पेठेत पोहोचले. त्यावेळी अतिक शेखकडे पाहून ऋषभने थेट बंदुक काढून त्याच्यावर रोखली. त्यामुळे अतिक पळु लागला. यावेळी ऋषभ जाधवने बंदुकीतून फायरिंग केले परंतु अतिक खाली वाकला त्यामुळे ही गोळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या अश्विनी कांबळे हिला लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत एक लहान मुल होते. सुदैवाने हे मुल वाचले यावेळी ऋषभ जाधवने चारवेळेस फायरिंग केले व ते तिघे तेथून दुचाकीने पसार झाले.

  याबाबत घटनास्थळी शाहूपुरी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने कर्मचारी पोहोचले. तेथील फायरिंग केलेल्या पुंगल्या पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपींचा कसून शोध घेण्याचे काम सुरु आहे. आरोपींच्या घरावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून त्याच्या इतर नातेवाईकांकडेही त्याच्या संदर्भात विचारपूस करण्यात येवू लागली आहे.

दरम्यान, जखमी झालेली अश्विनी कांबळे †िहची प्रकृती सुधारत चालली असून चिंतेचे काहीही कारण नसल्याचे उपचार करणाऱया डॉक्टरांनी जाहीर केले आहे. बुधवार पेठेत मुस्लीम समाज हा मोठय़ा प्रमाणावर असून सध्या रमजानचे दिवस सुरु आहेत. या पवित्र महिन्यात अशी घटना घडल्याने बुधवार पेठेत दुसऱया दिवशी ही भयाचे वातावरण होते.

Related posts: