|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » ‘सितेचा जन्म टेस्ट टय़ूब बेबी मधून’; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

‘सितेचा जन्म टेस्ट टय़ूब बेबी मधून’; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

रामाची पत्नी सीता यांचा जन्म हा टेस्ट टय़ूब बेबीमधून झाला आहे, असे विधान करणारे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण बिहारच्या सितामणी येथे शर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शर्मा यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सितामणी येथील एक स्थानीक वकिल ठाकुर चंदन सिंह यांनी शनिवारी सकाळी शर्मा यांच्याविरोधात तक्रार केली. दिनेश शर्मा यांच्या विधानामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आयपीसी कलम 295 (अ) आणि 120 (ब) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना, ‘रामायण काळामध्ये सीता या जमिनीतून बाहेर आल्या होत्या. म्हणजेच त्यावेळी असलेली टेक्नॉलॉजी ही टेस्ट टय़ूब बेबी प्रमाणे होती. म्हणजे सीता यांचा जन्म टेस्ट टय़ूब बेबीमधून झाला’, असे शर्मा म्हणाले होते. पत्रकारिता ही महाभारताच्या काळातही असेल. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. हे प्रकारचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’च होते. यावरच ते थांबले नाही. त्यांनी टेस्ट टय़ूब बेबी हे तंत्रज्ञान रामायमाच्या काळातही असावे, असा दावा केला. सीतेचा जन्म धरणीतून झाला, असे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की रामायणाच्या काळातही टेस्ट टय़ूब बेबी हा प्रकार अस्तित्वात असावा.