|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भीषण अपघातात दोघे जागीच ठार

भीषण अपघातात दोघे जागीच ठार 

वाकेड-बोरथडे फाटय़ावर कार-झायलोची समोरासमोर धडक

रत्नागिरी सिव्हील कर्मचाऱयासह सहकाऱयाचा अंत

ओरोस येथे बदलीच्या ठिकाणी जाताना दुर्घटना

प्रतिनिधी /लांजा

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड बोरथडे फाटय़ावर दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱयासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. प्रदीप नथुराम पिलणकर (42 ऱा भाटय़े, रत्नागिरी) व रोहित मदन मांडवकर (27 ऱा राजापुर, सध्या रत्नागिरी) अशी अपघातातील मृतांची नावे आहे. प्रदीप यांची सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ओरोस येथे बदली झाली असल्याने तेथे जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्रदिप नथुराम पिलणकर यांची सिंधुदुर्ग जिह्यातील ओरस येथे बदली झाल्याने ओरोस येथील कामाची माहिती घेण्यासाठी ते आपला मित्र रोहीम मांडवकर याच्या सोबत टोयेटा ईटीओस कार (एम एच 08, झेड- 1863 ) घेऊन निघाले होते. स्वतः पिलणकर गाडी चालवत होते तर रोहित मांडवकर त्यांच्या शेजारच्या सीटवर होता. त्यांची कार सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास लांजा तालुक्यातील बोरथडे फाटा येथे आली असता पिलणकर यांचा कारवरील ताबा सुटला आणि समेरून येणाऱया झायलो (एम एच 05, बी यू- 0275) कारवर त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिली.

दोन्ही गाडय़ांची धडक एवढी भीषण होती की दोन्ही गाडय़ांच्या समेरील बाजूचा चक्काचूर होऊन पिलणकर व मांडवकर हे दोघेही कारमध्येच अडकून पडले होत़े झायलो गाडीचा चालक सदाशिव राधेशाम सेलंकी (30, मुळ कोल्हापूर, सध्या मंदरुळ तिवंडामाळ, त़ा राजापुर) व कुडूस महंमद अन्सारी (22 ऱा मंदरुळ, तिवंडामाळ त़ा राजापुर) या दोघांनाही जबर दुखापत झाल्याने त गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच लांजा उपनिरीक्षक पंडीत पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल चवेकर यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल़े तर ईटीओस कारमध्ये अडकलेल्या मांडवकर व पिलणकर यांना पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचे मृतदेह लांजा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल़े झायलो कारमधील गंभीर जखमी झालेल्या दोघांना रात्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यातील एकाची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले आह़े अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ संथगतीने सुरू होती.

सोबत म्हणून गेला अन्…

अपघातात ठार झालेला रोहित मांडवकर हा काही वर्षांपुर्वी रत्नागिरी आरोग्य विभागामध्ये इलेक्ट्रीशिअन म्हणून ठेकेदारी पद्धतीवर काम करत होत़ा त्याचे वडिल लांजा आरोग्य विभागात कार्यरत असल्याने रोहीतची सिव्हीलच्या अनेक कर्मचाऱयांशी ओळख होत़ी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमधील इलेक्ट्रिशिअन असणारे प्रदीप पिलणकर यांच्याशी त्यांची चांगली मैत्री जमली होती. कंत्राट संपल्याने घरीच असलेल्या रोहीतला घेऊन पिलणकर ओरोस येथे बदलीच्या ठिकाणी कामाची माहिती घेण्यासाठी निघाले होते. मात्र अर्ध्या वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. सोबत म्हणून गेलेला रोहीत या अपघाताचा बळी ठरला.

रोहित एकुलता एक

रोहित मांडवकर याचे वडिल मदन मांडवकर हे लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत होत़े सध्या ते सेवनिवृत्त असून रोहित हा त्यांचा एकुलता एक मुलगा होत़ा त्याच्या निधनाने मांडवकर कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आह़े