|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » 94 टक्के आयटी पदवीधर नोकरीस पात्र नाहीत : टेक महिंद्रा सीईओ

94 टक्के आयटी पदवीधर नोकरीस पात्र नाहीत : टेक महिंद्रा सीईओ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील 94 टक्के आयटी क्षेत्रातील विद्यार्थी नोकरी करण्याच्या पात्रतेची गुणवत्ता नसल्याचे मत टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी व्यक्त केले आहे.

भविष्यात अनेक आमुलाग्र बदल घडवून आण्याकरीता आधुनिक बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असणार आहे. मानवी बळ, कौशल्य विकास ,सायबर हल्ला मशीन चलवण्याचे अत्याधुनिक ज्ञान या सर्व बदलांना भारतातील आयटी कंपन्याना टक्कर द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास युवकांच्या नोकरीचा प्रश्न समोर आल्यावर भारतातील 94 टक्के मोठय़ा आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्याची गुणवत्ता पात्र आयटी पदवीधर नसल्याचेही टेक महिंद्राच्या सीईओनी आपले मत नोंदवले आहे.

2022 पर्यत सायबर सिक्युरीटीच्या क्षेत्रात जवळपास 60 लाख नोकऱया निर्माण होणार आहेत. परतू यात आपल्याकडे कौशल्य कमी असल्याच्या कारणामुळे, नोकऱया निर्माण होऊनही त्या पदास पात्र उमेदवार मिळण्याची गरज अपूर्णच राहून जाते. आणि शिक्षीत असूनही कौशल्या अभावी नोकरी गमवावी लागून दिवसेंदिवस बेकारीत वाढ झाल्याचश चित्र तयार होत आहेत. 

केवळ 6 टक्के उमेदवाराची निवड..

 टेक महिंद्राने प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रात टॉपच्या 10 कंपन्यामधील केवळ 6 टक्के उमेदवारांना प्रशिक्षण देण्याकरीता निवडण्यात येते. कौशल्यावर आधारीत, बाजारातील गरज ओळखून प्रशिक्षण दिले जाते. यावर टेकचे सीईओ बाकी 94 टक्के उमेदवारच्या नोकरीचे काय होत असेल याविषय चिंता व्यक्त करीत शिक्षण क्षेत्रावर प्रश्न चिन्ह तयार करतात.