|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » एसटीचा संप मिटला, मागण्यावर सकारात्मक तोडगा

एसटीचा संप मिटला, मागण्यावर सकारात्मक तोडगा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसटी कर्मचाऱयांचा संप दोन दिवसांनंतर सकारात्मक तोडग्यानंतर मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. ‘इतकी वर्षे पगार नव्हते तरी कामगार काम करत होते. आता पगार वाढ देऊनही संप केला. कामगारांनी या राजकारणात पडू नये,’ असे आवाहन दिवाकर रावतेंनी केले. शिवाय दोन वेळा संप करूनही कारवाई केली नाही, मेस्मा फाईलवर सही केली नाही, यापुढे असे पाऊल उचलू नये, असेही रावते म्हणाले.

Related posts: