|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘घाडगे अँड सून’मध्ये ऋषी सक्सेनाची एण्ट्री

‘घाडगे अँड सून’मध्ये ऋषी सक्सेनाची एण्ट्री 

 कलर्स मराठीवर सध्या सुरू असलेली ‘घाडगे अँड सून’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ‘घाडगे अँड सून’मध्ये बऱयाच घटना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. घाडगे सदनमध्ये माई आणि अण्णा यांचा

लग्नाचा 50 वा वाढदिवस अमफताने खूप उत्साहात साजरा केला. ज्यामध्ये सगळय़ांनाच अक्षयची कमतरता भासली. अण्णा यांनी अक्षयला घाडगे सदनमधूनच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले. याचा खूप मोठा धक्का घरच्यांना आणि अक्षयला बसला. अमफता आता घाडगे परिवारामध्ये रुळू लागली आहे. वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत. पण माईची खंबीर साथ असल्याने या अडचणीला देखील ती खंबीरपणे तोंड देत आहे. या सगळय़ा घटनांमध्ये आता मालिकेमध्ये एक नवी एन्ट्री लवकरच होणार आहे. मालिकेच्या नुकत्याच सुरू झालेल्या काही प्रोमोजमधून अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकलेला ऋषी प्रेक्षकांना एका नव्या अंदाजमध्ये बघायला मिळाला आहे. या प्रोमोमध्ये अमफता आणि ऋषी एकमेकांना पहिल्यापासूनच ओळखत आहे असे समजते. तेव्हा ऋषीच्या मालिकेमध्ये येण्याने मालिकेला आणि अमफता-अक्षयच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? हे तर प्रेक्षकांना मालिका बघितल्यावरच कळेल. ‘घाडगे अँड सून’  ही मालिका रात्री 8.30 वाजता कलर्स मराठीवर प्रसारीत होते.