|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मान्सूनच्या आगमनाने हेस्कॉमचे दावे ठरले फोल

मान्सूनच्या आगमनाने हेस्कॉमचे दावे ठरले फोल 

बेळगाव / प्रतिनिधी

रविवारी शहर व परिसरात मान्सूनचे दमदार आगमन झाले. परंतु मान्सूनच्या पहिल्याच दणक्मयाने हेस्कॉमचे तीनतेरा वाजले. सर्व दावे फोल ठरवत हेस्कॉमचा गलथान कारभार उघड झाला आहे. शहरात रविवारपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटल रोडवर तब्बल 12 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. हेस्कॉमच्या या एकूण कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी शहराला मुसळधार पावसाने दणका दिला. यामुळे वीजखांब पडले असून विद्युत पुरवठा ठप्प झाला. काही भागात झाडे कोसळून हेस्कॉमला मोठा फटका बसला. त्यातच दिवसभर जोरदार पाऊस असल्याने दुरुस्तीची कामे हाती घेणे हेस्कॉम कर्मचाऱयांना शक्मय होत नव्हते. काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मरदेखील कोसळल्याच्या घटना घडल्या.

पावसाळय़ाच्या दिवसात सुरळीत विद्युतपुरवठा करण्याचा दावा हेस्कॉमने केला होता. परंतु हा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला आहे. पाऊस पडताच वीज गायब असे प्रकार वारंवार घडत आहेत. याचा फटका नागरिकांबरोबरच व्यावसायिकांनाही बसला आहे. त्यामुळे हेस्कॉमने वीज व्यवस्थेत सुधारणा आणाव्यात, अशी मागणी होत आहे.

रविवारी सिव्हिल हॉस्पिटल रोडवर भूमिगत वीजवाहिनी खराब झाल्याने वीजपुरवठा ठप्प होता. क्लब रोड येथील बसवेश्वर बँकेच्या समोर इन्सुलेटरमध्ये पाणी जाऊन ते खराब झाले होते. जि. पं. कार्यालय, बागायत खाते, काळी अंबराई, गांधी भवन येथे झाड कोसळल्याने व फांद्या तुटल्याने विद्युत पुरवठा ठप्प झाला. ऑटोनगर येथे ट्रान्स्फॉर्मरच कोसळल्याने हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे.

याच बरोबर शहराच्या काही भागात विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. शहापूरमध्ये तब्बल चार तास विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल झाले. विद्युत पुरवठा नाही त्यात जोराचा पाऊस अशी दुहेरी समस्या उद्भवत होती. यामुळे मोबाईल, टीव्ही, फ्रीज यासारखी विद्युत उपकरणे बंद होती. यासाठी हेस्कॉमने पाऊस सुरू होण्यापूर्वीच खबरदारी घेणे गरजेचे होते.