|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अज्ञात वाहनाने ठोकरल्याने पाच बकऱयांचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाने ठोकरल्याने पाच बकऱयांचा जागीच मृत्यू 

वार्ताहर / सांबरा

पंतबाळेकुंद्री नजीक अज्ञात वाहनाने ठोकरल्याने पाच बकऱयांचा जागीच मृत्यू झाला तर सहा बकरी जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

सध्या मान्सून पाऊस दाखल झाला असून बकऱयांचे कळप डोंगर दऱयाकडे निघाले आहेत. अनगोळ, मजगाव, भागातील बकऱयांचे कळप देखील सोमवारी रात्री बेळगावहून नेसरगीकडे निघाले होते. रात्रीच्यावेळी महामार्गावर वाहनांची वर्दळ नसते त्यामुळे मेंढपाळ शक्मयतो रात्रीच्यावेळीच कळप घेऊन जातात. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सुमारे तीनशे बकऱयांचा कळप पंतबाळेकुंद्री नजीक आला असता एका अज्ञात वाहनाने बकऱयांना जोरदार धडक दिली. यामध्ये कल्लाप्पा भागाप्पा कडोलकर रा. मजगाव यांची तीन तर नरसू फकिरा मलतवाडी रा. अनगोळ यांच्या दोन बकरींचा जागीच मृत्यू झाला. तर सहा बकरी जखमी झाली आहेत. या दोघांची मिळून तीनशे बकरी आहेत. अपघातानंतर वाहनचालकाने तेथे न थांबताच पुढे निघून जाणे पसंत केले. या घटनेने कडोलकर व मलतवाडी यांचे सुमारे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे 

 

Related posts: