|Sunday, February 17, 2019
You are here: Home » क्रिडा » बर्मिंगहॅम स्पर्धेतून शरापोव्हाची माघार

बर्मिंगहॅम स्पर्धेतून शरापोव्हाची माघार 

वृत्तसंस्था /लंडन :

पुढील आठवडय़ात बर्मिंगहॅममध्ये सुरू होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेतून रशियाची 31 वर्षीय महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाने पुरेशा विश्रांतीसाठी माघार घेतली आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी ती पुन्हा उमेदीने सहभागी होणार आहे. तीन वर्षांनंतर शरापोव्हा यावेळी विंबल्डनमध्ये पुनरागमन करेल.

शरापोव्हाने 2004 साली विंबल्डन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2015 पर्यंत या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही. 2016 साली उत्तेजक चांचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत शरापोव्हा सध्या 23 व्या स्थानावर असून गेल्या आठवडय़ात पॅरीस येथे झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तिला स्पेनच्या मुगुरूझाकडून पराभव पत्करावा लागला होता.

Related posts: