|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निष्काळजीपणामुळे घडताहेत विद्युत अपघात

निष्काळजीपणामुळे घडताहेत विद्युत अपघात 

प्रतिनिधी /.बेळगाव :

हेस्कॉमने सर्व सुरक्षित साहित्य कर्मचाऱयांना पुरवूनही काही वेळा निष्काळजीपणामुळे मोठे अपघात घडतात. हेस्कॉम कर्मचाऱयाने रबरी हातमोजे, बूट, पक्कड, हेल्मेट, सेफ्टी जॅकेट परिधान करूनच खांबावर चढले पाहिजे. खांबावरील वीजपुरवठा बंद केलेला आहे का? याची खातरजमा करूनच काम सुरू करावे. अन्यथा, मोठा अपघात घडू शकतो, अशी माहिती साहाय्यक कार्यकारी अभियंता एस. पी. कोलकार यांनी दिली.

शहर उपकेंद्र 1 व 2 अंतर्गत येणाऱया हेस्कॉमच्या सर्व कर्मचाऱयांना सुरक्षितता जपण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवारी रेल्वेस्टेशन येथील कार्यालयात करण्यात आले होते. व्यासपीठावर साहाय्यक कार्यकारी अभियंता जी. एम. पाल, लेखाधिकारी धरमदास उपस्थित होते.

जी. एम. पाल म्हणाले, विद्युत विभागाने विद्युत अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे लाईनमन, मीटर रिडर, सेक्शन ऑफीसर, साहाय्यक अभियंता या सर्वांना अपघात घडू नये, यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. हेस्कॉम हे आपले कुटूंब असून प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

लेखाधिकारी धरमदास यांनी कर्मचाऱयांना पॉवरमन हे नामकरण का करण्यात या मागचा हेतू सांगितला. परशराम बेळकट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर हेस्कॉमच्या इतर अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. यावेळी हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Related posts: