|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपच्या काळात अमलीपदार्थात वाढ

भाजपच्या काळात अमलीपदार्थात वाढ 

प्रतिनिधी /म्हापसा :

राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थ सापडण्याच्या घटना होत आहेत. आज विद्यार्थीवर्ग या अमलीपदार्थाच्या आहारी गेला आहे. याला भाजप सरकारच जबाबदार आहे. भाजप सरकारच्या राजवटीत अमलीपदार्थाच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वृत्तीचा आप जाहीर निषेध करीत असल्याची माहिती आपचे केंद्रीय सदस्य प्रदीप घाडी आमोणकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी राज्यसदस्य सुनिल सिंगापूरकर उपस्थित होते. पुढे बोलताना आमोणकर म्हणाले की, दोन दिवसापूर्वीच 4 कोटीचे अमलीपदार्थ सापडला. गेल्यावर्षी सोनशे येथे एका युवकाचा अमलीपदार्थ सेवनाने मृत्यू झाला. फोंडा संपूर्ण अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे. गोव्याच्या कानाकोपऱयात अमलीपदार्थ खुलेआम सापडत आहेत. ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. भाजप व काँग्रेस हे दोन्ही एकाच माळेचे दोन पक्ष आहेत. त्यांना कुणाचेही काही पडलेले नाही. आपल्या स्वार्थासाठी ते आवाज करीत आहेत. भाजपच्या या वृत्तीचा आप निषेध व्यक्त करीत आहे. पोलिस निष्क्रिय व भ्रष्ट्राचारी बनले आहे. एक वर्षापूर्वी निवडणूकी कालावधीत आम्ही दोन झेंडे लावले त्यापैकी एकाची परवाणगी होती मात्र त्याचा छळ आजही सुरु आहे. म्हापसा पोलिस आम्हाला बोलावून घेऊन आमचा छळ करीत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. अमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी आता आप हाच एक पर्याय उरला आहे असे ते म्हणाले.

Related posts: