|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोठय़ा उत्साहात मुख्यमंत्र्यांचे आगमन

मोठय़ा उत्साहात मुख्यमंत्र्यांचे आगमन 

प्रतिनिधी /पणजी :

गेले तीन महिने अमेरिकेत उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कधी गोव्यात दाखल होतील याबाबत समस्त गोमंतकीयांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर काल गुरुवारी संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पर्रीकरांनी दाबोळी विमानतळावर पाऊल ठेवले. अमेरिका ते मुंबई आणि मुंबई ते गोवा असा प्रवास त्यांनी केला. पर्रीकर गोव्यात दाखल झाल्याचे कळताच भाजप कार्यकर्ते आणि तमाम गोमंतकीयांनी आनंद व्यक्त केला. तीन महिन्यांच्या उपचारानंतर पर्रीकर अमेरिकेतून गोव्यात परतले आहेत.

स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी 5 मार्च रोजी पर्रीकर अमेरिकेत गेले होते. सुमारे तीन महिने त्यांनी अमेरिकेत उपचार घेतले. अमेरिकेतील यशस्वी उपचारानंतर ते काल गुरुवारी पुन्हा गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री गोव्यात कधी येतात यासंदर्भात मंत्री, आमदार वाट पाहत होते. भाजप कार्यकर्त्यांनाही उत्सुकता लागून राहिली होती. अखेर काल ते गोव्यात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, मंत्री, आमदार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विमानतळावरून थेट निवासस्थानी

दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर थेट आपल्या खासगी निवासस्थानी ताळगाव येथे दाखल झाले. मुख्यमंत्री आज शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेच आजपासूनच ते कामाला सुरुवात करतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठकही मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही बैठक आता पुढे ढकलल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Related posts: