|Monday, July 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 17 जून ते 23 जून 2018

मेष

सूर्य, चंद्र लाभयोग व बुध-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे भाषण व दौरे प्रभावी ठरतील. डावपेच यशस्वी होतील. बुधवार, गुरुवार संसारात किरकोळ वाद होईल. धंद्यात खर्च झाला तरी फायदा होईल. चौकस बुद्धी वापरा. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. शेतकरी वर्गाला मोठय़ा लोकांच्याकडून आश्वासन मिळेल. परीक्षेत यश मिळेल. मनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडता येईल.


वृषभ

अडचणीतून मार्ग काढता येईल. संसारातील तणाव व समस्या सोडवता येईल. दोघांची तयारी असल्यास कोर्टापर्यंत जाणारे प्रकरण बाहेरच फिरवता येईल. चंद्र, बुध लाभयोग व शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरि÷ांच्या संमतीने चांगले निर्णय घेता येतील. अर्धवट योजना पूर्ण होऊ शकतील.  धंद्याला मोठे काम मिळेल. जिद्द ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


मिथुन

बुध, नेपच्यून त्रिकोण योग व शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. सर्वच क्षेत्रातील समस्या व तणाव संपवता येईल. नोकरीत बदली व प्रमोशन होऊ शकेल. धंद्यातील वाद मिटेल. नवे काम मिळेल. थोरा मोठय़ांची मदत मिळेल. प्रयत्न करा. कोर्टकेस संपवून टाका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रति÷ा मिळेल. लोकप्रियता वाढेल. स्वत:चे अस्तित्व तयार करा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


कर्क

आत्मविश्वास व उत्साह असला तरी विरोधक समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. रागावर नियंत्रण ठेवा. सूर्य, मंगळ केंद्रयोग व बुध,प्लुटो युति होत आहे. बोलताना वेळ प्रसंगाचे भान ठेवा. तुमची प्रतिमा खराब होणार नाही यांची काळजी घ्या. वरि÷ांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या मतांचा विचार घेऊन निर्णय घ्या व मत व्यक्त करा. व्यवसायात अडचणीवर मात करा. वाहन जपून चालवा.


सिंह

सूर्य, चंद्र लाभयोग व बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. या सप्ताहात तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. कठीण कामे करून घ्या. रविवार घरात किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तुमचे मुद्दे  पटवून देता येईल. मैत्रीत तणाव होऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात चमकाल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सहवासाने भाळून जाल.


कन्या

चंद्र, बुध लाभयोग व शुक्र,मंगळ प्रतियुती होत आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये  अंदाजबरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला तुमचा निर्णय घेता येईल. योजना पूर्ण करा, लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक व पैसा मिळेल. शेतकरी वर्गाला मार्ग मिळेल.


तुळ

बुध, नेपच्यून  त्रिकोणयोग व सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील. तुमच्या विचारांना दिशा मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. शेतकरी वर्गाला चांगले दिवस येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरि÷ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी देतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात पुढे याल. घरात सुखद वातावरण राहील.


वृश्चिक

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग व चंद्र, शुक्र लाभयोग होत  आहे. सप्ताहाच्या शेवटी  राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. विरोधक हल्लाबोल करतील. तुमचे बोलणे तुमच्यावर उलटले जाईल. धंद्यात नीट बोल. अहंकाराने भागिदारी तुटण्याची शक्मयता आहे. संसारात वृद्ध व्यक्तीच्यासाठी दगदग करावी लागेल. नोकरीत कुणाचीही नाराजी होईल, असे कृत्य टाळा. प्रति÷sची काळजी घ्या.


धनु

रविवार प्रकृती बिघडण्याची शक्मयता आहे. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. सूर्य, चंद्र लाभयोग व बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. सोमवारपासून रेंगाळत राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. शेतकरी वर्गाला परिस्थितीचा अंदाज  घेऊन काम करता येईल. पैसा जपून ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरी मिळेल. कला,क्रीडा क्षेत्रात चमकाल. जीवनसाथीची मर्जी राखा.


मकर

शुक्र, शनि षडाष्टक योग व बुध, प्लुटो प्रतियुती होत आहे. बुद्धिवाद घालण्यापेक्षा स्वत:च्या कार्यावर जास्त लक्ष द्या. अहंकारी भाषणाने तुमच्यावर टिका होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. सोमवार, मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. साडेसाती सुरू आहे. मारामारी, व्यसन यामुळे आयुष्य बिघडवू नका. धंद्यात सावध रहा. कामगार वर्ग, अधिकारी यांना सांभाळा. स्पर्धा कठीण असेल.


कुंभ

रवि, चंद्र लाभयोग व बुध, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. बुधवार, गुरुवार रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. घरात वाद व तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. वाटाघाटीत जवळच्या व्यक्ती नाराजी दर्शवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. वरि÷ांचे सहकार्य मिळेल. लोकांच्यासाठी कार्य करण्याची तत्परता दाखवा. क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. मित्र नाराज होईल. धंद्यात सुधारणा होईल.


मीन

चंद्र, शुक्र लाभयोग, बुध, प्लुटो प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. तुमच्या बोलण्यातून गैर अर्थ राजकीय, सामाजिक क्षेत्रात सोमवार, मंगळवार यादिवशी काढला जाईल. धंद्यात वाढ होईल. कामगार वर्गाशी संयमाने बोला. कोर्टकेसमध्ये किरकोळ अडचणी येऊ शकतात. नोकरीत मेहनत घ्यावी लागेल. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.