|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » leadingnews » बोरीवलामधील धर्मक्षेत्र इमारतीत लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

बोरीवलामधील धर्मक्षेत्र इमारतीत लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली रोडवरील इमारतीत आग लागल्याची घटना घटली आहे. या लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास येथील चौदा मजल्यांच्या धर्मक्षेत्र या इमारत क्रमांक तीनच्या तळमजल्यावर आग लागली.

या आगीच्या चपाटय़ात येऊन मृत्यू झालेल्या महिलेचे नाव जया रमेश घरसिया असे असून लक्ष्मी यरोला ही महिला जखमी झाली. कांदिवलीतील शताब्दी रूग्णालयात लक्ष्मी यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिनांसह आगीवर नियंत्रण मिळविले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.