|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दोन अपघातात दोघांचा मृत्यू

दोन अपघातात दोघांचा मृत्यू 

शहर प्रतिनिधी/ फलटण

राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत मारुती सेलेरो व दुचाकी अपघातात एकशिव (ता. माळशिरस) येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. तसेच दुसऱया एका घटनेत लोणंद-सातारा रोडवरती ताबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पोचालक उमेश बाळासा घोडके (वय 38 वर्षे, रा. बुधगाव ता. मिरज जि. सांगली) हे ठार झाले.

   याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, 17 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एकशिव (ता. माळशिरस) येथून गिरवी ता. फलटण येथे अत्यंविधीच्या कार्यक्रमास दुचाकी (क्रमांक एमएच 42 जे 8677) या गाडीवरून शिवराज राजाराम चौधरी (वय 18), मनिषा राजाराम चौधरी व साईराज रवींद्र रणवरे (सर्व रा. एकशिव ता. माळशिरस) हे गिरवी येथे निघाले होते. राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत आल्यावर फलटण बाजूकडून येणाऱया ट्रकला ओव्हरटेक करून मारुती सेलेरो (क्रमांक एमएच 12 एनपी 0138) या गाडीने भरधाव वेगात चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील शिवराज चौधरी याच्या डोक्यास जबर मार लागून तो जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या मनिषा चौधरी व साईराज रणवरे या दोघांना गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

   याबाबत मारुती सेलेरो चालक किसन गिरजू गोपाळे (रा. सुतारवाडी, पाषाण जि. पुणे) यांच्य ा विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ करीत आहेत.

ट्रक-टेम्पोच्या धडकेत टेम्पोचालक ठार

लोणंद-सातारा रोडवरती ताबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पोचालक उमेश बाळासा घोडके (वय 38 वर्षे, रा. बुधगाव ता. मिरज जि. सांगली) हे ठार झाले आहेत, तर टेम्पोचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची नोद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद ते सातारा जाणाऱया रोडवर भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ सातारा बाजूकडून जाणाऱया चारचाकी मालवाहक ट्रक (क्र. एमपी 33 एच 4449)चा चालक बलराम कल्याणसिंह कुशवाह (वय 23 वर्षे, रा. कल्याणसिंह कुशवाह कला सतनवाडा शिवपुरी मध्यप्रदेश) याने भरधाव वेगाने दारूच्या नशेत चुकीच्या दिशेने मालट्रक चालवून समोरुन सातारा बाजूकडे निघालेल्या टेम्पो (क्र. एमएच 09 ईएम 211) ला जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पोचालक उमेश बाळासा घोडके (वय 38 वर्षे, रा. बुधगाव ता. मिरज जि. सांगली) हे मयत झाले तर क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार हे करीत आहेत.