|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जैन समाजाला सर्व सुविधांचा लाभ देऊ

जैन समाजाला सर्व सुविधांचा लाभ देऊ 

प्रतिनिधी/ निपाणी

सध्या सर्वच समाजात अशांतता दिसून येत आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात अडथळे येत आहेत. यासाठी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी पुढाकार घेऊन एकी टिकवून ठेवावी व समाजाचा विकास साधावा. शिक्षण, व्यापार क्षेत्रात जैन समाजाचा होत असलेला विकास कौतुकास्पद आहे. समाजाने अशीच घोडदौड पुढे चालू ठेवावी. राज्य सरकारतर्फे मिळणाऱया सर्व सुविधांचा लाभ देण्यास कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नगरप्रशासनमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.

स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात दक्षिण भारत जैन सभेचे 98 वे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी द. भा. जैन सभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत युवा नेते उत्तम पाटील यांनी केले तर प्रास्ताविक द. भा. जैन सभेचे उपाध्यक्ष दत्ता डोर्ले यांनी केले.

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, जैन समाजाला अल्पसंख्याक म्हणून मान्यता असल्याने शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. समाजात पूजाविधीवर खर्च करण्याबरोबरच शिक्षणासाठीही खर्च करण्याची तयारी आवश्यक आहे. काही मुनींमुळेदेखील समाजात दुही पडण्याचा धोका आहे.  त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी, द. भा. जैन सभेतर्फे शिक्षण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात होत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी अथणीचे आमदार महेश कुमठहळ्ळी, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण पुरस्कार डॉ. अनिल पाटील सातारा, नागनाथआण्णा नायकवडी समाजसेवा पुरस्कार प्रा. शिवाजी पाटील, बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार शिवाजीराव पाटोळे कोल्हापूर यांना, आचार्य कुंकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन पुरस्कार धनपाल हाबळे सांगली, आचार्य विद्यानंद साहित्य पुरस्कार आदिनाथ कुरुंदवाडे अब्दूललाट यांना वितरीत करण्यात आले.

तसेच बाहुबली साहित्य पुरस्कार श्रीपाल बोगार हुबळी, व्ही. आर. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार अशोक घोरपडे सांगली, बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस ऍवार्ड सुधाकर काशिद कोल्हापूर, डॉ. डी. एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार डॉ. जयकांता बडबडे इचलकरंजी, आदर्श संस्था पुरस्कार बेडकिहाळ येथील वीराचार्य अल्पसंख्यांक संस्थेला, बाबासाहेब कुचनुरे आदर्श युवा पुरस्कार भरत गाट हुपरी, प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सविंद्र पाटील समडोळी, आदर्श उद्योजिका पुरस्कार सारिका खुरपे मजरेवाडी यांना वितरीत करण्यात आले.

यावेळी प्रगती व जिनविजय विशेषांक तसेच स्मरणिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार काका पाटील, प्रा. सुभाष जोशी, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, पंचगंगाचे अध्यक्ष पी. एम. पाटील, ऍपेक्स बँक संचालक लक्ष्मणराव चिंगळे, अशोककुमार असोदे, राजू पाटील अकोळ, उद्योजक गोपाल जिनगौडा बेळगाव, आर. बी. खेमलापुरे, किरण पाटील अथणी, इरगौडा पाटील, द. भा. जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. डी. ए. पाटील, चेअरमन सागर चौगुले, संजय शेटे, अजित पाटील, ऍड. ए. ए. नेमण्णावर, स्तवनिधी क्षेत्र कमिटी अध्यक्ष किरण पाटील, बाळासाहेब मगदूम, प्रा. विलास उपाध्ये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.

चौकट

रावसाहेब पाटलांचे योगदान मोठे

केपीसीसी उपाध्यक्ष वीरकुमार पाटील म्हणाले, यापूर्वी द. भा. जैन सभा मर्यादित होती. मात्र कलाप्पाण्णा आवाडे व रावसाहेब पाटील यांच्यामुळे सभेचा विकास झालाआहे. अध्यक्षपदाच्या काळात रावसाहेब पाटलांचे योगदान मोठे असून समाजाच्या विकासासाठी त्यांच्यासोबत एकत्र काम करणार आहोत, असे सांगितले. यावेळी अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी तसेच मान्यवरांनी जैन समाजाच्या विकासासाठी भरीव देणगी दिली.

Related posts: