|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार केंद्राचा कार्यारंभ

जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार केंद्राचा कार्यारंभ 

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील जीवनविद्या मिशनच्यावतीने इंद्रप्रस्थनगर येथे बालसंस्कार केंद्राचा कार्यारंभ करण्यात आला. या केंद्राच्या कार्यारंभप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. डॉ. के. एस. पावसकर यांच्या यशोदा हॉस्पिटल येथे दर रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत हे संस्कार केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. बालचमूंच्या हस्ते फीत कापून हा कार्यारंभ झाला.

यावेळी मिशनचे मार्गदर्शक शंकरराव बांदकर यांनी उपस्थितांना बालसंस्काराचे महत्त्व विशद केले. त्यानंतर बालचमूने प्रार्थना सादर केली. बालवर्गाला संस्काराची गरज असून आजची पिढी यामधून नव्याने प्रशिक्षण घेईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी डॉ. कृष्णानंद पावसकर, केतकी पावसकर, शंतनू पावसकर, पूजा ठाकुर आदींसह पालकवर्ग आणि जीवनविद्या मिशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

  

 

Related posts: