|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे निधन

प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे मंगळवारी सकाळी 5 वाजता निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन टय़ुमर झाला होता. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दीपक शहा हे फॅशन जगतातील मोठे नाव होते. अनेक कलाकारांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले होते. त्यांनी 1987 साली मुंबईमध्ये मोअरमिश्चिफ या नावाने त्यांचे दुकान सुरु केले. त्यांच्या आकर्षक डिझाईन्समुळे अनेक सिनेकलाकार त्यांच्याकडून आपले कपडे डिझाईन करुन घेत असत. जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, अमिताभ बच्चन, सलमान खान, सचिन तेंडुलकर अश्या दिग्गजांसाठी त्यांनी काम केले. मुंबईनंतर त्यांनी पुणे आणि दुबईतही त्यांचे दुकान सुरु केले. पुणेकरांना एक वेगळी स्टाईल देण्यात शहा यांचा मोठा वाटा होता. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.