|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजेच्या धक्क्मयाने हेस्कॉम कर्मचारी जखमी

विजेच्या धक्क्मयाने हेस्कॉम कर्मचारी जखमी 

बेळगाव / प्रतिनिधी

फुलबाग गल्ली, पहिला क्रॉस येथे वीज वाहिन्यांची दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून हेस्कॉमचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. विजय हिरेमठ (वय 43) असे या कर्मचाऱयाचे नाव असून, त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या विजय यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते जखमी झाले. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाला नाही. तरी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. उर्वरित कर्मचारी व नागरिकांनी त्यांना इस्पितळात दाखल केले.

ट्रान्स्फॉर्मर बदलण्याची मागणी

येथील ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती अथवा नवा ट्रान्स्फॉर्मर बसवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या या ट्रान्स्फॉर्मरमुळे नागरिकांनाही धोका होत आहे. कचरा टाकण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.