|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शेतकऱयांनी थाटली रस्त्यावरच मंडई

शेतकऱयांनी थाटली रस्त्यावरच मंडई 

वार्ताहर /बारामती :

शहराचे वाढते औघोगिकीकरण, वाढती लोकसंख्या व भाजीमंडईमधील सुविधांवर असणारा ताण लक्षात घेता, या सर्वबाबींचा विकासात्मक निर्णय घेऊन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी बारामतीत कोटय़ावधी रुपये खर्चुन बारामतीत भाजीमंडई बांधली. मात्र, तरी देखील भाजीमंडई सोडून शेतकऱयांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटले असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.

माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंडईचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, कोटी रुपये खर्च करुन सुद्धा मंडई थेट रस्त्यावर असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. शेतकऱयांनी रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासकीय भवन, काटे, हॉस्पिटल, व मंडईच्या बाजूचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध नागरिकांनी मनमानी पध्दतीने वाहने लावल्याने नागरिकांनी नाहक त्रास होत असल्याचे दिसून आले. गुरुवारी बारामतीचा आठवडे बाजार असतो, त्यामुळे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते.