|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » बुलेटसह नाल्यात कोसळून तरूणाचा मृत्यू

बुलेटसह नाल्यात कोसळून तरूणाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये उघडय़ा नाल्यांचा प्रश्न चिघळला असून उघडय़ा नाल्यात पडून सलग 2 दिवसात 2 नागरिकांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मनपा उपायुक्तांना मारहाणा केली आहे.

औरंगाबाद शहरातील जय भवानी नगर येथे नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एन सिक्स परिसरात एकाच नाल्यात बुडून मृत्यू झाला. चेतन चोपडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 38 वर्षांचे होते. चेतन बुलेट गाडीसह नाल्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली.

 

चेतन चोपडे रात्री घराकडे जात होते. शहरात पावसाचा जोर वाढत होता, त्यामुळे त्यांना रस्ता आणि नाला यातील फरक कळला नाही आणि ते थेट नाल्यात जाऊन पडले.