|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » ‘शाह ज्यादा खा गया’, नोटाबंदीवरून राहुल गांधींचा शाहांवर निशाणा

‘शाह ज्यादा खा गया’, नोटाबंदीवरून राहुल गांधींचा शाहांवर निशाणा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटाबंदीदरम्यान जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.

 

यावरुनच काँग्रेस अध्यक्षांनी अमित शाहांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजप नेते अनेकदा राहुल गांधींना ’शहजादा’ म्हणून टोमणे मारतात. तोच आधार घेत राहुल गांधींनी ’शाह ज्यादा खा गया, असा हॅशटॅग वापरुन निशाणा साधला आहे.अभिनंदन, अमित शाह जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला पुरस्कार जिंकला आहे. पाच दिवसात 750 कोटी! लाखो भारतीयांचं आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झालं, तुमच्या या कामगिरीला सलाम, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

 

 

 

 

 

Related posts: