|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार

दहशतवाद्यांचे मृतदेह थेट अज्ञातस्थळी पुरणार 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतेह कुटंबीयांकडे सोपवण्याऐवजी अज्ञात स्थळी पुरण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे. अतिरेक्यांच्या अंतयात्रेला ज्या पद्धतीने गर्दी होते, भडकाऊ भाषणे होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुण मोठय़ प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. युवकांना अशा अंत्ययात्रेत जाण्यापासून रोखणे शक्मय नसल्याने गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर लष्कराने असा निर्णय घेतला आहे. याशिवाय अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर दहशतवादी या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात.

सोशल मीडियावर अशा व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आकर्षित केलं जातं. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र यासारख्या दहशतवादी संघटना दहशतवाद्यांच्या अत्ययांत्रेचा फायदा तरुणांना आकर्षित करण्यासाठी करतात. सोशल मीडियावर अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज व्हायरल केले जातात आणि यातून नवीन दहशतवादी तयार होतात.