|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण अवलंबितांची फेंडा शहरातून जागृती फेरी

खाण अवलंबितांची फेंडा शहरातून जागृती फेरी 

प्रतिनिधी/ फोंडा

खाणबंदीला शंभर दिवस पूर्ण होऊनही सरकारतर्फे कोणतीच ठोस कृती होत नसल्याच्या निषेधार्थ खाण अवलंबितांतर्फे काल शनिवारी सकाळी फोंडा शहरातून जागृती फेरी काढण्यात आली.

यावेळी खाणग्रस्तातील धारबांदोडा टिप्पर ट्रक संघटनेचे अध्यक्ष बालाजी गावस, मशिनरी संघटनेचे सचिन परब, कामगार नेते पुती गावकर, फोंडा व आसपासच्या भागातील खाण अवलंबित सरकारविरोधी न्याय मागण्यासाठी काळय़ा रंगाचा  पेहराव करून जागृती फेरीत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्न केंद सरकारात मांडून 3 जुलै रोजी सोडविण्याचे आश्वासन दिले असून तोपर्यत खाण अवलंबित संयम राखणार आहेत. त्यानंतर 18 जुलैपर्यंत प्रत्येक आमदाराच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. शेवटी 19 जुलै रोजी पर्वरी येथे विधानसभा संकुलासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार नेते पुती गावकर यांनी दिला.