|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » आईला टॅक्टरसमोर टाकणाऱया मुलांवर गुन्हा , एकाला अटक

आईला टॅक्टरसमोर टाकणाऱया मुलांवर गुन्हा , एकाला अटक 

ऑनलाईन टीम / वाशिम :

शेतीच्या वादातू आपल्या जन्मदात्या आईवरच टॅक्टर घातल्याप्रकरणी पोलिसांनी मुलांवर गुन्हा दाखल केल्या आहे. कैलास दळवी आणि अंकुश दळवी यांच्यावर कलम 307नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतल लगेच सायंकाळी अंकुश दळवीला पोलिसांनी अटक केली असून कैलास दळवी हा फरार झाला आहे.

मालेगाव तालुक्मयातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱयात कैद झाली. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वतःच या घटनेची दखल घेत फिर्याद दिली.वाशिम जिह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मालेगाव तालुक्मयातील मुंगळा गावातील ही घटना कॅमेऱयात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Related posts: