|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही : चंदकांत पाटील

मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही : चंदकांत पाटील 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आरक्षण देणे आमच्या हातात नसून फी देणे किंवा योजना करणे ते आम्ही केले आहे. मात्र आरक्षणाबाबत मागास अयोगाच्या अहवालावर सगळे अवलंबून आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने चेंडू पुन्हा एकदा मागास आयोगाच्या कोर्टान ढकलल्याचे दिसत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हाताता नाही.मागास आयोगाने त्यांच्या पाहणीतून निष्कर्ष काढले आहेत. मराठा समाज मागास असेल तर त्यांना आरक्षण द्या. तो अहवाल स्वीकारणे हे सरकारचे काम आहे.शिवाय मागास अयोगाचा अहवाल लवकर येणे हे पण आमच्या हातात नाही, कारण ते स्वायत्त आहे.आयोगाला आवश्यक मदत,सामुग्री आम्ही पुरवत आहोत.परंतु घटनेच्या बाहेर आपण काही करू शकत नाही’

 

Related posts: