|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आरोपींना फासावर लटकवा

आरोपींना फासावर लटकवा 

मंदसौर बलात्कार पिडीतेच्या पालकांची मागणी

इंदूर / वृत्तसंस्था

मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्हय़ात 8 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे इरफान ऊर्फ भय्यू (वय 20) आणि असीफ (वय 24) अशी आहेत. त्यांना फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी पिडीत बालिकेच्या मातापित्यांनी केली आहे. आम्हाला नुकसान भरपाईत काहीही स्वारस्य नाही. आमच्या मुलीला न्याय हवा आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. हे बलात्कार प्रकरण 26 जूनला घडले होते. बलात्कारामुळे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या बालिकेवर उपचार सुरू आहेत.

Related posts: