|Sunday, December 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, आईमुळे वाचले बालकाचे प्राण

दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, आईमुळे वाचले बालकाचे प्राण 

सूरत

 सूरत शहराच्या नवागाम उड्डाणपूलावर रविवारी रात्री एका वेगवान एसयुव्हीने तीन दुचाकींना धडक दिली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेदरम्यान पूलावरून खाली कोसळणाऱया एका महिलेने स्वतःच्या 6 महिन्याच्या बाळाला दुसऱया महिलेच्या दिशेने फेकल्याने त्याचा जीव वाचू शकला. विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने येणाऱया एसयुव्ही पजेरोला पाहून एका बाइकस्वार दांपत्याने रेलिंगच्या दिशेने धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला, तर त्यांच्या मागून येणाऱया दुचाकी मात्र पजेरोला धडकल्या. यातील एका बाइकवरून पती-पत्नी आणि त्यांचा 6 महिन्यांचा मुलगा तसेच सुमारे 8 वर्षांची मुलगी प्रवास करती होती, धडक बसल्याने ते उड्डाणपूलावरून खाली पडू लागले, बाइकवरील महिलेने 6 महिन्यांच्या बाळाला वाचविण्यासाठी त्याला हवेत झेपावले असता दुसऱया महिलेने त्याला पकडले. मुलगा वाचला असला तरीही त्याचे आईवडिल उड्डाणपूलावरून खाली पडल्याने ठार झाले. तर मुलाच्या बहिणीचा धडकेमुळे अगोदरच मृत्यू झाला होता. धडक दिल्यानंतर पजेरोतील तीन जणांनी तेथून पळ काढला. या दुर्घटनेमुळे बचावलेल्या बालकाने स्वतःचे पूर्ण कुटुंब गमावले आहे.

Related posts: